by

एन.डी.ए. परीक्षा तयारी वर्ग

वर्षातून दोन वेळा यु. पी. एस. सी. तर्फे लेखी परीक्षा घेतल्या जातात. त्यास अनुसरून संस्था चीत्तवापन ब्राम्हण संघ नाशिक च्या सहकार्याने परीक्षा तयारी वर्गाचे आयोजन करते अनुभवी शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळते. लेखीपरीक्षेमध्ये उतीर्ण झालेल्याविद्यार्थ्यांना सेर्विसेस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीबाबतचे संपूर्ण मार्गदर्शन माजी सैनिकी अधिकाऱ्याकडून मिळते. याबाबतची माहिती पुस्तिका संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध आहे.

by

उंची वाढ वर्ग-

या उपक्रमात संस्थेचे नाशिक शहरात अग्रेसर स्थान असून वर्षातून दोन वेळा- वासंतिक व हिवाळी वर्गांचे आयोजन करण्यात येते. दहा ते अठरा या वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थिनी याउपक्रमात उस्ताहाने भाग घेऊन वर्गाचा लाभ घेतात.

by

बॅडमिंटन वर्ग-

संस्थेचे प्रशस्त असे बॅडमिंटन कोर्ट असून तेथे सुमारे पन्नास स्री-पुरुषखेळाडू निमितपणेभाग घेतात. सायांकाळी बॅडमिंटन प्रशिक्षण वर्गही चालू असतो . बॅडमिंटन कोचिंग वर्गाला श्री. एस. जी. अभ्यंकर मार्गदर्शन करतात.


by

कराटेवर्ग-

अमेरिकन फेडरेशन ऑफ मार्शल आर्ट अकॅडमी चे श्री. सुनील सिंग हे वर्गघेत आहेत. ह्या वर्गाचा नियमितपणे सुमारे ३० ते ४० विद्यार्थी लाभघेतात.

by

सुसंस्कारवर्ग-

वर्षातून दोन वेळा वासंतिक व हिवाळी असे सहा दिवसांच्या सुसंस्कार वर्गाचे आयोजन केले जाते. यात संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला, हस्तकौशल्य, कथाकथन, जादूचे प्रयोग, आकाश दर्शन, हस्ताक्षर, खेळ व सहलींचे कार्यक्रम घेतले जातात. रिमांड होम नशिक हि संस्था आपल्या विद्यार्थ्यांना आवर्जून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पाठवते